मूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक सरकारची आगामी काळातील दिशा स्पष्ट

review meeting maharashtra government
review meeting maharashtra government 

विधानभवन येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी विशेष आढावा बैठक घेतली. 

सरकारच्या आगामी वाटचालीची स्पष्ट दिशा ठरवत, महाराष्ट्राला क्रमांक 1 वर ठेवण्यासाठी थांबू नका, असा मंत्र त्यांनी दिला.

राज्याची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प, वॉररूम्स, आणि लोकाभिमुख योजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पुढील वाटचालीतील स्पष्ट दिशा व निर्देश दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रशासनाची आढावा बैठक

मूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्यासह आढावा बैठक घेतली असून त्यांनी या आढावा बैठकीत खालीलप्रमाणे महत्वाचे दिशा निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

  • पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता या तत्त्वांवर सरकारची वाटचाल असावी.
  • राज्यातील फ्लॅगशिप योजनांसाठी स्वतंत्र वॉररूम सुरु करा. यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत योजनांचा लाभ गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • केंद्र सरकारच्या सहकार्याचा अधिकाधिक उपयोग करण्यावर भर देताना, अधिक समन्वयासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन अधिक कार्यक्षम करा.
  • राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वॉररूम आहेच. ती अधिक सक्षम करा. मुख्य सचिवांनी या वॉररूमसाठी प्रकल्पांचे नव्याने नियोजन करावे.
  • जनता दरबार आणि लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या.
  • जिल्ह्यांचे पालक सचिवांनी तातडीने दौरे सुरु करावेत.
  • विभागीय पोर्टल्स अपडेट करा आणि अधिक प्रभावी बनवा.
  • लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील यावर लक्ष केंद्रित करा.
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित केले जाईल, अशी घोषणाही मूख्यमंञी यांनी केली.

याप्रमाणे आढावा बैठकीत राज्याचे मूख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण दिशा निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Post a Comment

0 Comments